पत्नीचा मोबाईल बंद पडताच पतीची आत्महत्या

Foto

औरंगाबाद: घरातुन रागाने निघुन गेलेल्या पत्नीला पती फोनवर बोलत असताना, पत्नीचा मोबाईल बंद पडला. तोच पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना करमाड येथील झोपडपट्टी परिसरात रात्री घडली.

 नामदेव शंकर गुंजाळ (वय 30 वर्षे) रा. करमाड असे गळफास घेऊन आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, नामदेव गुंजाळ यांना चार मुली व एक मुलगा आहे. त्यांनी सहा महिन्यापूर्वी हप्त्यावर ट्रक घेतली. ट्रकचे हप्‍ते फेडण्यात त्यांना आर्थिक अडचण येत होती. मागील तीन हप्‍ते त्यांनी भरले नव्हते. त्यामुळे घरात किरकोळ कारणावरुन पत्नीसोबत वाद होत होता. दहा दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा घरात वाद झाला. वाद झाल्या मुळे पत्नी पुणे येथे नातेवाईकांकडे गेली. काल सकाळी पत्नीला फोन करुण गावाकडे बोलावले. त्यामुळे पत्नी दुपारीच पुणे येथून निघाली. पण गाडीत बसल्यावर पत्नीच्या मोबाईलची चार्जीगं संपल्यामुळे मोबाईल बंद पडला. नामदेव यांनी पत्नीला बर्‍याच वेळेस फोन केला. पण फोन लागला नाही. अखेर नामदेव यांनी औरंगाबाद येथून करमाड गाठले. करमाड येथील घरात दुसरे नातेवाईक नव्हते. त्यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. शेजारच्या नातेवाईकांनी घर उघडे असल्यामुळे आत पाहीतले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती करमाड पोलिसांना कळवताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नामदेव यांना बेशुध्द आवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार सर्यकांत पाटील हे करीत आहेत.